राधानगरी पाऊस

राधानगरी पाऊस

ग्रामीण भागात पावसाचा जोर

राधानगरी धरणक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाचा जोर वाढला असून राधानगरी धरणक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली. गगनबावडा व भुदरगड तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे.
...

राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ
राधानगरी ः धरणक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली. गेल्या २४ तासांत धरणक्षेत्रात ८८ तर दाजीपुरात १२४ मिलिमीटर पाऊस झाला. आठवडाभरातील पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वीस फुटांनी वाढ झाली आहे.
पाऊस सुरू होण्यापूर्वी पाणी पातळी २८७ फूट इतकी होती. ती आज ३६० फुटापर्यंत पोहोचली आहे. काळम्मावाडी धरणाच्या पाणीसाठ्यात पावणेदोन टीएमसीने वाढ झाली आहे. या धरण क्षेत्रात २४ तासांत ६७ तर तुळशीत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, आज दुपारपासून राधानगरी धरणातून वीज निर्मितीसाठी ७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
संततधार पावसाने पाणीसाठ्यात होणारी वाढ नियंत्रित राखण्यासाठी बीओटी तत्त्वावरील वीज केंद्रातून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. मात्र धरण पायथ्याशी असलेल्या आणि बंद करण्यात आलेल्या जुन्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीला महाजेनकोकडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. यंदाच्या पावसाळ्यात या केंद्रातून पूर्ववत वीज निर्मिती सुरू करण्यासाठी तीन महिन्यापूर्वीच जनित्र संचाची विशेष देखभाल दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ सुरू झाल्यानंत, जलसंपदाकडून वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्याची तयारी दर्शविण्यात आली. तरीही महाजनकोकडून काहीच हालचाली झालेल्या नाहीत.
...
शिरगाव परिसरात शेतीकामांना गती

शिरगावः गेले दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने शेतकरी राजा सुखावला आहे. शेतीच्या खोळंबलेल्या कामांना आता गती आली आहे.
भात रोपलावणीची काम अर्धवट राहिली होती. रोपलावणीसाठी चिखल गुट्टा करण्यासाठी पावसाचेच पाणी लागते, पण पावसाअभावी ही कामे खोळंबली होती. शिवारात आता पाणीच पाणी झाल्याने रोपलागणीच्या कामांना गती आली आहे.
...
तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर
धामोड : सकाळपासून येथील तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. २४ तासात २९ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे . केळोशी बुद्रुक येथील लोंढा नाला प्रकल्प ३५ टक्के भरला आहे. दरम्यान, तुळशी धरणातून सोडण्यात आलेला नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे .

....
01499
पोंबरेः प्राथमिक शाळेवर कोसळलेले झाड

बाजारभोगावः पोंबरे(ता पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेवर झाड कोसळल्याने शाळेच्या पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सुदैवाने शाळा बंद असताना ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली. शाळेच्या आवारात सुरूची काही झाडे आहेत. त्यापैकी वाळलेले मोठे झाड वादळी वाऱ्यामुळे शनिवारी पहाटेच्या सुमारास शाळेच्या पुढील बाजूस कोसळले. त्यामुळे छताचे मोठे नुकसान झाले असून यात शाळेचे सुमारे लाखाहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे.
...

आंबा, विशाळगड परिसरात संततधार

आंबा ः तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबा, विशाळगड व दक्षिणेकडील येळवण जुगाई परिसरात पावसाची संततधार सुरू आहे.
पावसामुळे भात रोपलावणीची धांदल उडाली आहे. संततधारेमुळे कडवी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कडवी मध्यम प्रकल्पासह मानोली व कासार्डे येथील लघुपाटबंधारे तलावात पाणी पातळी वाढली आहे. आंबा घाटात पाऊस आणि धुके आहे. पावसाअभावी खोळंबलेल्या भात रोप लावणीसाठी परळे निनाई, वाकोली, चांदोली, केर्ले, वारूळ, गजापूर भागात एकच धांदल उडाली आहे.
...

बोरपाडळे परिसरात पावसाची रिपरिप
बोरपाडळे : बोरपाडळेसह शहापूर, माले , मिठारवाडी, आंबवडे, काखे, मोहरे आदी परिसरामध्ये गेले दोन दिवस आणि काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com