मोबाईल टॉवर

मोबाईल टॉवर
Published on

वाकीघोलसह परिसरात
७ मोबाईल टॉवर मंजूर
राधानगरी, ता. २ ः प्रस्तावित नवीन सात मोबाईल टॉवरमुळे दुर्गम डोंगराळ वाकीघोल व अभयारण्य क्षेत्रातील मोबाईल सेवेपासून उपेक्षित खेडी वाड्यावस्त्या लवकरच मोबाईल रेंजमध्ये येणार आहेत. नव्याने उभारणी होणाऱ्या टॉवरमुळे रेंजची तांत्रिक समस्या दूर होणार आहे. ‘बीएसएनएल’च्या गावोगावी इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी डिजिटल इंडिया योजनेअंतर्गत नवीन ७ मोबाईल टॉवर मंजूर झाले आहेत. सद्यःस्थितीत काळम्मावाडी धरण पाणलोट क्षेत्राबाहेर असणाऱ्या वाकीघोल व विस्तारित अभयारण्य क्षेत्रातील अनेक खेड्यांत टॉवरअभावी मोबाईल सुविधा नाही. वेळप्रसंगी मोबाईल रेंजसाठी खेड्यांतील लोकांना दूरपर्यंत रेंजच्या शोधार्थ यावे लागते. शैक्षणिक, शासकीय कामकाजात इंटरनेट सेवेची समस्या आहे. या समस्या नवीन टॉवरमुळे दूर होणार आहेत. राधानगरी तालुक्यातील आडोली, चाफोडी तर्फे ऐनघोल, गावठाणवाडी सावरदे, दुबळेवाडी, कंदलगाव आणि दाजीपूर या ठिकाणी नवीन टॉवरची उभारणी होईल.

कोट
खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नातून नवीन टॉवरना मंजुरी मिळाली. डिसेंबर २०२३ पर्यंतचे टॉवर उभारणीचे काम सुरू होईल. अनेक वर्षे मोबाईल व इंटरनेट सेवेपासून दूर राहिलेल्या वाकीघोल व अभयारण्य क्षेत्रातील खेड्यात फोर-जी सेवा उपलब्ध होईल.
- आमदार प्रकाश आबिटकर, राधानगरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.