‘भोगावती’ची २६ मार्चअखेरची बिले शेतऱ्यांच्या खात्यावर जमा

‘भोगावती’ची २६ मार्चअखेरची बिले शेतऱ्यांच्या खात्यावर जमा

‘भोगावती’ची २६ मार्चअखेरची
बिले शेतऱ्यांच्या खात्यावर जमा

सकाळ वृत्तसेवा
राशिवडे बुद्रुक, ता. २९ : भोगावती सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील २६ मार्चपर्यंतची उर्वरित सर्व ऊस बिले प्रतिटन ३२०० रुपयांप्रमाणे २६ कोटी १५ लाख रुपये ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील व उपाध्यक्ष राजाराम कवडे यांनी दिली.
कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील उसासाठी प्रतिटन ३२०० रुपये ऊसदर जाहीर केला होता. मार्चमध्ये गाळप झालेल्या ८१ हजार ७१९ टन उसाची २६ कोटी १५ लाख ३७९४ रक्कम संबंधित ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. कारखान्याने आतापर्यंत संपूर्ण हंगामातील ५ लाख १० हजार ६८९ टन उसाच्या बिलापोटी १६३ कोटी ४२ लाख रुपये बिल शेतकऱ्यांना दिले आहे. कारखान्याने यंदाच्या हंगामात १२२ दिवसांत ५ लाख १० हजार ६८९ टन उसाचे गाळप करून ६ लाख २९ हजार ३२० क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सरासरी साखर उतारा १२.३२ टक्के आहे. आगामी हंगामात सहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून, ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्याकडे नोंद करून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष पाटील व उपाध्यक्ष कवडे यांनी केले आहे. यावेळी सर्व संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे उपस्थित होते.
...................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com