कबड्डी स्पर्धांना येळवडेत प्रारंभ

कबड्डी स्पर्धांना येळवडेत प्रारंभ

कबड्डी स्पर्धांना येळवडेत प्रारंभ
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथे शिवभक्त कबड्डी स्पोर्टसच्या वतीने गुरुवार (ता. २) पासून दोन दिवस कबड्डी स्पर्धांना सुरुवात झाली. ३५ किलो व ५५ किलो वजनी गटांमध्ये या स्पर्धा होणार असून, सायंकाळी पाचपासून रात्री उशिरापर्यंत प्रकाशझोतात येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर होणार आहेत. ३५ किलो वजनी गटासाठी अनुक्रमे १५ हजार, १० व सात हजार रुपये आणि चषक यासह वैयक्तिक बक्षिसे, तर ५५ किलो वजनी गटासाठी २१, १५ व १० हजारसह चषक व वैयक्तिक बक्षिसे असतील. येथील प्राथमिक शाळेच्या पटांगणावर कबड्डी मैदान तयार केले असून, प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था स्टेडियम पद्धतीने केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com