गव्याच्या धक्याने जखमी

गव्याच्या धक्याने जखमी

04380
हत्तीमहल : गव्याने मोटारीवर उडी घेतल्याने झालेले नुकसान
...
धावत्या मोटारीवर गव्याची उडी
राधानगरीतील वन्यजीव कार्यालय परिसरातील घटनाः तिघेजण किरकोळ जखमी

राधानगरी, ता. १३ : वेळ सकाळी सात-साडेसातची. नेहमीप्रमाणे सकाळच्या निरव शांततेत कोकणाकडे जाणारे आणि तिकडून येणाऱ्या लोकांची वर्दळ राज्य मार्गावर सुरू होती. अचानक वन्यजीव कार्यालयाच्या परिसरात नदीकडून पाणी पिऊन येणाऱ्या गव्यांच्या कळपातील एका गव्याने उडी मारली ती थेट प्रवाशांच्या मोटारीवरच. गव्या पुढचे दोन खूर गाडीच्या काचेत घुसले आणि अनर्थ घडता घडता थांबला. यामध्ये तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत .
याबाबतची अधिक माहिती अशी, येथील राज्यमार्गावर येथून एक किलोमीटर अंतरावर सांगावकर मळ्याजवळ सकाळी सात-साडेसातच्या सुमारास गव्यांचा कळप नदीवरून पाणी पिऊन आला. त्यातील एका बिथरलेल्या गव्याने कुंपणावरून अचानकपणे कोकणाकडे जाणाऱ्या मोटारीवर जोराची उडी घेतली. त्याचे पुढचे दोन्ही पाय काचेत घुसले व शरीर चालकाच्या दारावर आपटले. जोरदार धडक बसल्याने गाडीतील नीलेश अर्जुन मर्गज (रा. सिंधुदुर्ग ), महेश श्रीकांत पाटील व आकाश महेश पाटील (रा. कोल्हापूर) हे तिघेजण जखमी झाले. या धडकेत मोटारीचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी वनपाल सूर्यकांत गुरव यांनी भेट देऊन जखमींना राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या परिसरात सातत्याने गव्यांचे माणसावर हल्ले होत आहेत. वन्यजीव कार्यालयाचे मुख्यालय या ठिकाणी आहे. पंधरा-वीस कर्मचारी येथे असतात. मग, असे का घडते? याचा शोध या खात्याने फारसा घेतलेला नाही. कार्यालयाच्या मागे जंगलाचा टापू आहे. या टापूमध्ये ‘म्हातारीचे पाणी’ म्हणून प्रसिद्ध पाणवठा आहे. तिथे पाणी आटले की गवे नदीकडे येतात. ते पाणी का आटते याचा शोध घ्यायला हवा आणि पाण्याची सोय तिथेच व्हायला हवी, तरच अशा घटना थांबणे शक्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com