ड्रोनद्वारे ७० गावांतील मिळकतींचा सर्व्हे पूर्ण

ड्रोनद्वारे ७० गावांतील मिळकतींचा सर्व्हे पूर्ण

ड्रोनद्वारे ७० गावांतील मिळकतींचा सर्व्हे पूर्ण

राधानगरी भूमिअभिलेखची कार्यवाही ः १२ गावांमध्ये सनद वाटप

सकाळ वृत्तसेवा
राधानगरी, ता. १६ ः भूमिअभिलेख विभागाने राधानगरी तालुक्यातील ७० गावांतील मिळकतधारकांच्या मिळकतींचा ड्रोनद्वारे सर्व्हे पूर्ण केला. संबंधित मिळकतधारकांना आता मालमत्तेच्या स्केलमध्ये मालकी हक्क व चतु:सीमांची सनद मिळणार आहे. सध्या ५९ गावांतील मिळकतीची सनद तयार झाली आहे, तर १२ गावांच्या मिळकतीच्या सनदांचे वाटप केले आहे. उर्वरित ११ गावांतील मिळकतीच्या सनदा तयार करण्यात येत आहेत.
भूमिअभिलेख विभागाने अत्याधुनिक यंत्रणेच्या वापरातून गावागावांतील मिळकतधारकांच्या हद्दी, चतु:सीमा, खुल्या जागा, बांधकाम क्षेत्र निश्चित केले आहे. त्याची मिळकतधारकांना सनद मिळणार आहे. गावठाणातील प्रत्येक इमारत जागेच्या मालकाला मिळणारी सनद त्याच्या मालमत्तेचा महत्त्वपूर्ण दस्तवेज ठरणार आहे. सनदेमध्ये जमिनीचे क्षेत्र, जमीन महसूल आणि इतर शर्ती नमूद केल्या आहेत. यातून सनद ही मालकी हक्क तसेच जमिनीवर असलेले इतर हक्क दर्शविते. सनदेमध्येच स्केलमध्ये आकृत्या व दिशा दर्शविण्यात आल्या आहेत.

सनद तयार झालेली ५९ गावे
गवशी, सावतवाडी, पाल बुद्रुक, पाल खुर्द, गोतेवाडी, मानेवाडी, खामकरवाडी, कोनोली तर्फे असंडोली, केळोशी खुर्द, लाडवाडी, कोते चांदे, कोदवडे, मोहडे, सिरसे, आमजाई व्हरवडे, कुऱ्हाडवाडी, माजगाव, शेळेवाडी, बारडवाडी, चक्रेश्वरवाडी, मालवे, मांगोली, तारळे, राशिवडे खुर्द, मुसळवाडी, घोडेवाडी, कांबळवाडी, तरसंबळे, कंदलगाव, मानबेट, पडसाळी, कुकूडवाडी, कंथेवाडी, कळंकवाडी अणाजे, खिंडी व्हरवडे, गुडाळवाडी, करंजफेन, सावर्धन, पडळी, रामणवाडी, पाट पन्हाळा, चाफोडी, गावठाणवाडी, वडाचीवाडी, आडोली, दुबळेवाडी, मांगेवाडी, सुळंबी, मोघर्डे, मल्लेवाडी, बुजवडे, हेळेवाडी, सावरदे, धामणवाडी, आटेगाव, पनोरी, एैनी

सनद वाटप १२ गावे
सावतवाडी, पाल बुद्रुक, पाल खुर्द, मुसळवाडी, मानेवाडी, मोहडे, शेळेवाडी, बारडवाडी, कुकुडवाडी, गुडाळवाडी, मांगेवाडी, सुळंबी.

सनद तयार न झालेली ११ गावे
आपटाळ, वाघवडे, तळगाव, दुर्गमानवाड, आवळी खुर्द, कुडूत्री, सोन्याची शिरोली, वलवण, कासारपुतळे, मौजे कासारवाडा, हसणे.
........
कोट...
तालुक्यातील ७० गावांतील मूळ गाव गणातील मिळकतीच्या ड्रोन सर्व्हेनंतर बिनचूक सनद तयार करण्यात येत आहे. पुढील काळात शासन निर्णयानंतर गावांच्या नवीन गावठाण विस्तारातील मिळकतींचा ड्रोन सर्व्हेची कार्यवाही होईल. ज्यांच्या सनद तयार आहेत, त्यांच्याकडून शासन नियमानुसार शुल्क भरून घेऊन सनद देण्यात येत आहे. ११ गावांच्या मिळकतींच्या सनद लवकरच तयार होतील.
समीर खडकवाले, उपअधीक्षक, भूमिअभिलेख राधानगरी
..............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com