प्रीपेड मीटरविरोधात राधानगरीत निदर्शने

प्रीपेड मीटरविरोधात राधानगरीत निदर्शने

प्रीपेड मीटरविरोधात
राधानगरीत निदर्शने
राधानगरी, ता. १०ः घरगुती आणि शेतीपंपाच्या ग्राहकांना प्रीपेड मीटर देण्याच्या योजनेविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महावितरणच्या येथील उपविभागीय कार्यालयावर निदर्शने केली. यावेळी सहायक अभियंता ओंकार परीट यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले म्हणाले,‘महावितरण कंपनी शासनाच्या अर्थसहाय्यावर उभारलेली ग्राहकांची हक्काची कंपनी आहे. या कंपनीत विजेचा वापर करणारे ग्राहक मीटर रिडींगनुसार वीज बिल भरतात, पण यामध्ये केंद्र सरकारकडून खासगीकरण घाट घातला जात आहे. प्रीपेड मीटर शेती पंप वापरासाठी आणि घरगुती वापरासाठी बसविण्याचा हट्ट करू नये. या धोरणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्याच्या रोजी रोटीचा प्रश्न उपस्थित होणार आहे. एकही मीटर राधानगरी तालुक्यात बसवू देणार नाही. प्रीपेड मीटरविरोधात जनआंदोलन उभारून महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकू.’
यावेळी शिवसेनेच्या वतीने प्रीपेड मीटर योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी निदर्शने करत केंद्र सरकार आणि महावितरणविरोधात घोषणा दिल्या. यावेळी तालुकाप्रमुख उत्तम पाटील, तालुका संघटक सागर भावके, संजय पाटील, महिला तालुकाप्रमुख विमल पाटील, सुषमा पाटील, जयश्री पाटील, विजय टेपुगडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com