...अन्यथा आरोग्य केंद्राला टाळे ठोकू

...अन्यथा आरोग्य केंद्राला टाळे ठोकू

Published on

...अन्यथा आरोग्य केंद्राला टाळे ठोकू

गैरसोयींप्रश्नी राशिवडे बुद्रुक ग्रामस्थ आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
राशिवडे बुद्रुक, ता. ८ ः येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कर्मचारी नाहीत, औषधांचाही तुटवडा आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही पूर्तता होत नाही. त्यामुळे चार दिवसांत मागणीनुसार पाठपुरावा न केल्यास आरोग्य केंद्राला टाळे ठोकू, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांनी याची दखल घेऊन मंगळवारी (ता. ९ ) येथील ग्रामपंचायतीमध्ये तातडीची बैठक बोलावली आहे. शिवाय अपुऱ्या कर्मचाऱ्यांसह औषधांची दोन दिवसांतच पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
गेल्या वर्षभरापासून येथील आरोग्य सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. कर्मचारी संख्या अत्यल्प आहे. औषधे नसणे, इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगणे, वैद्यकीय अधिकारी वेळेत हजर नसणे आदी तक्रारी वाढत आहेत. कावीळची साथ असतानाही आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध नव्हता, तर सलाईन नसणे, रेबीज इंजेक्शन तुटवडा, प्रसूतीसाठी महिलांना सी.पी.आर.कडे पाठविणे आदी कारणांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हाके यांनी आम्ही वरिष्ठाकडे अपुरे कर्मचारी व औषधाच्या तुटवड्याबाबत वारंवार मागणी करूनही पूर्तता होत नसल्याची खंत व्यक्त केली.
या सर्व कारभाराला वैतागून ग्रामस्थांनी थेट आरोग्य केंद्र गाठून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारवेर धरले. त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शेटे यांनी तात्काळ ग्रामपंचायत पदाधिकारी व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन मागणीची पूर्तता  करण्याचे आश्वासन दिले.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.