केंद्रीय अधिकारी होण्यासाठी शहीद परिवाराचे बळ मोलाचे

केंद्रीय अधिकारी होण्यासाठी शहीद परिवाराचे बळ मोलाचे
Published on

08069
तिटवे : पांडुरंग फोंडे यांच्या सत्कारप्रसंगी लक्ष्मीबाई पाटील, डॉ. जगन्नाथ पाटील, प्रा. प्रशांत पालकर, अनिल पाटील, प्रा. सुनील पाटील, विजय गायकवाड, बिनॉय किणीकर आदी.

केंद्रीय अधिकारी होण्यासाठी
शहीद परिवाराचे बळ मोलाचे
पांडुरंग फोंडे : तिटवेत शिक्षण प्रसारक मंडळातर्फे सत्कार
कसबा वाळवे, ता. १४ : राधानगरीच्या धनगरवाडा ते केंद्रीय पोलिस दलात अधिकारी होण्याची झेप ही शहीद परिवाराने पंखांना दिलेल्या बळामुळेच शक्य झाले, असे मत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात यूपीएससीमार्फत २५२ रँक घेऊन निवड झालेल्या पांडुरंग बाबूराव फोंडे यांनी व्यक्त केले.
तिटवे (ता. राधानगरी) येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे सहकुटुंब झालेल्या सत्कारावेळी ते बोलत होते. फोंडे म्हणाले, ‘‘शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे पालकत्व मला लाभले. त्यांनी दिलेले आर्थिक आणि मानसिक पाठबळ मोलाचे ठरले. वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, डॉ. जगन्नाथ पाटील, अनिल पाटील यांचे सहकार्य लाभले. डॉ. पाटील यांच्या ‘चंबुखडी ड्रीम्स’ या आत्मचरित्रातून प्रेरणा मिळाली.’’ डॉ. पाटील म्हणाले, ‘पटका, धोतर, टोपी व नऊवारीतल्या आई-वडिलांच्या मुला-मुलींचे स्वप्न पूर्ण करण्याचे स्वप्न शहीद परिवाराने आज सत्यात उतरवले आहे.’’ मार्गदर्शक विजय गायकवाड आणि बिनॉय किनीकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्याध्यक्ष प्रा. सुनील पाटील, गंगुबाई फोंडे, बाबूराव आदी उपस्थित होते. प्रा. शुभांगी भारमाल यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com