

Tomato Prices Rise
sakal
कोल्हापूर : गेल्या आठवड्यात वीस ते तीस रुपये प्रतिकिलो असा टोमॅटोचा दर होता. हाच दर आजच्या आठवडा बाजारात दुप्पट म्हणजेच प्रतिकिलो ५० ते ६० रुपये किलो असा झाला आहे. शेवग्याच्या शेंगेंचा दर पन्नास रुपयास दोन नग, तर गवारीने वर्षभरापासून शंभरी पार दराची परंपरा कायम राखली आहे.