

धामोड - कोल्हापूर-राधानगरी राज्य महामार्गावर आमजाई व्हरवडेपासून सहा किलोमीटरच्या अंतरावर असणारी निसर्गसंपन्न धामोड गावच्या परिसरातील प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना खुणावू लागली आहेत. रस्त्यालगतच असणारे विस्तीर्ण तुळशी धरण, गावातील प्राचीन मंदिरे, मनमोहक डोंगर, वनराई, येथील सांस्कृतिक परंपरा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील निसर्गसंपन्न हे गाव आहे. या गावापासून जवळच तुळशी नदी आहे. गगनबावडा येथे जाणारा पर्यटक याच मार्गाने जातो.
लक्ष वेधून घेणारा सनसेट
गावात बारमाही पर्यटन होते. तुळशी जलाशय सनसेट, ज्योतिर्लिंग मंदिर, तलावाच्या पायथ्याशी असलेले हनुमान मंदिर, बगीचा, ऐतिहासिक किलचा येथील केंद्रबिंदू आहे. तसेच कोते येथे प्राचीन पांडवकालीन मंदिरे आहेत. तुळशी जलाशयावर पर्यटकांचे सतत रेलचेल असते. नीरव शांत निसर्गसंपन्न अशा या तुळशी जलाशयावर जिल्ह्यातून पर्यटक येतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.