बांबवडे येथील केंद्रावर शिष्यवृत्तीची ५ वी व ८ वी इयत्तेची परीक्षा होती. श्रीधर व्हनागडे इयत्ता आठवीत शिकत होता. स्कॉलरशिपची परीक्षा देण्यासाठी तो बांबवडे येथे गेला होता.
शाहूवाडी : शिष्यवृत्तीची परीक्षा (Scholarship Exam) देऊन बांबवडेहून घरी परतत असताना ट्रॅक्टर ट्रॉलीखाली (Tractor Accident) सापडल्याने पिशवी पैकी व्हनागडेवाडी (ता. शाहूवाडी) येथील श्रीधर संजय व्हनागडे (वय १४) हा शालेय विद्यार्थी जागीच ठार झाला. तो इयत्ता आठवीत शिकत होता. हा अपघात रविवारी दुपारी घडला. अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसांत (Shahuwadi Police) झाली आहे.