गेल्या वर्षभरात घाटातील एका वळणावर सातत्याने अपघात झाले. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सिमेंटची भिंत उभारली होती. मात्र, अपघातांमुळे ती कोलमडली आहे.
चंदगड : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या तिलारी घाटाच्या (Tilari Ghat) दुरुस्तीला अखेर बांधकाम विभागाला (Construction Department) मुहूर्त मिळाला आहे. घाटातील एका वळणावर अपघातप्रवण क्षेत्र असून, तिथली दुरुस्ती गरजेची असल्याच्या मुद्यावर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग ठाम राहिल्याने बांधकाम विभागाने आजपासून कामाला सुरुवात केली आहे.