राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक धोकादायक 

Traffic on Rajaram Bandhara is dangerous
Traffic on Rajaram Bandhara is dangerous
Updated on

कोल्हापूर : अगोदरच बंधारा अरूंद, त्यात रस्त्यासाठी टाकलेला स्लॅब वाहून गेल्याने पडलेले खड्डे, तुटलेले सरंक्षक कठडे आणि पर्यायी पुलाचे रखडलेले काम यामुळे येथील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक धोकायदाक बनत आहे. सोमवारी (ता. 4) या बंधाऱ्यावरून एक चारचाकी थेट नदीपात्रात पडल्याने पर्यायी पुलाची गरज अधोरेखित झाली आहे. 

देशातील पहिला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा अशी ओळख असलेल्या या बंधाऱ्याची आता दुरवस्था झाली आहे. वडणगे, केर्ली, केर्ले, पन्हाळा या जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातून औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या लोकांसाठी या बंधाऱ्यावरील वाहतूक म्हणजे जवळचा मार्ग. साखर हंगामाच्या काळात राजाराम कारखान्याला ऊस घेऊन येणाऱ्या बैलगाड्याही याच मार्गावरून येतात. गेली अनेक वर्षे अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा साक्षीदार राहीलेल्या या बंधाऱ्याचे अनेक सरंक्षक कठडे तुटलेले आहेत. या बंधाऱ्यावरील रस्ता करण्यासाठी सिमेंट कॉंक्रीटचा स्लॅब टाकला; पण तो अनेकदा वाहून गेला आहे. स्लॅब वाहून गेलेल्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत, हे खड्डेच अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. 
दोन वर्षापूर्वी या बंधाऱ्यावरून येत असताना केवळ सरंक्षक कठडे नसल्याने शहाजी मासाळ या गुणी आणि विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर या बंधाऱ्यावर बॅरिकेट लावण्यात आले; पण सध्या पावसाळ्यात ते काढून ठेवले आहेत. हे बॅरिकेट जरी आता लावले असते तरी कालची घटना टळली असती; पण या बंधाऱ्याला लागूनच नव्याने बांधण्यात येत असलेल्या पर्यायी पुलामुळे या बंधाऱ्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष आहे. तथापि पर्यायी पुलाचेही काम रखडले आहे. पर्यायी पुलाचे चार कॉलम उभे आहेत. गेल्यावर्षी पावसामुळे आणि यावर्षी कोरोनामुळे हे काम सध्या ठप्प आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाला जोडणारा हा बंधारा एकमेव वाहतुकीचा मार्ग आहे. त्यामुळे वर्दळ ही ठरलेली असते. आता साखर हंगाम सुरू होणार असून, त्यावरून ऊसाच्या भरलेल्या बैलगाड्यांचीही वाहतूक होणार आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी या बंधाऱ्याची दुरूस्ती आणि पर्यायी पुलाचे काम पूर्ण होण्याची गरज आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Sugar Season 2026
UPI Transaction Charges on Payments
Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
Amal Mahadik Reveals BJP Strategy After Chandrakant Patil's Crucial Meeting
Marathi News Esakal
www.esakal.com