सभापती, सचिव व संचालकांनी मान्यतेनेच बदल्या केल्या होत्या. मात्र, एका अकाउंटंटची मर्जी राखण्यासाठी ९० जणांच्या बदल्या केल्या गेल्या.
कोल्हापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत (Krushi Utpanna Bazar Samiti Kolhapur) ९० कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यात अकाउंटंट असलेल्या एका अधिकाऱ्याने बदली स्वीकारण्यास असमर्थता दर्शविली. त्यासाठी वारणेकाठच्या एका वजनदार नेत्याने एका अकाउंटंटची बदली वाचविण्यासाठी प्रशासकीय कामकाजाचा भाग असणाऱ्या ९० जणांची बदली रद्द करण्यासाठी निर्णायक प्रयत्न केले. त्याला यश आले आणि बाजार समितीतील त्या ९० बदल्या रद्द झाल्याचा आदेश निघाला.