
Sangli Traffic Changes : सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात सर्वत्र गणेशाचे वाजतगाजत आगमन करण्यात येणार आहे. गणेश आगमनादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल केले आहेत. यासाठी आगमन आणि विसर्जन मार्गावर प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक अन्य मार्गे वळविण्यात आली आहे.