esakal | मुलाने ट्विट केले आणि आईवर सुरू झाले उपचार !
sakal

बोलून बातमी शोधा

treatment start on mother after soon tweet

सोशल मीडियावर जे काही चालते त्याची बऱ्या आणि वाईट अर्थाने दखल घेतली जात आहे. आज वाळवा तालुक्यात असाच एक अनुभव आला.

मुलाने ट्विट केले आणि आईवर सुरू झाले उपचार !

sakal_logo
By
धर्मवीर पाटील

इस्लामपूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे बहुतांश चांगले अनुभव नागरिकांना येऊ लागले आहेत. विशेषतः सोशल मीडियावर जे काही चालते त्याची बऱ्या आणि वाईट अर्थाने दखल घेतली जात आहे. आज वाळवा तालुक्यात असाच एक अनुभव आला. एका मुलाने आपल्या आईच्या आजाराचे ट्विट केले आणि सांगली जिल्हा परिषद तसेच वाळवा पंचायत समिती प्रशासनाने त्याची तात्काळ दखल घेऊन त्याच्या आईवर उपचार सुरू केले.

वाळवा तालुक्यातील करंजवडे येथील एका युवकाने आज ट्विटरवर आपल्या आईच्या आजारपणाबाबत ट्विट केले. त्याने जिल्हा परिषद सांगली, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना टॅग करत म्हटले की, 'मी प्रतिक पाटील, एका समस्येवर आपले लक्ष वेधत आहे. माझ्या आईवर इस्लामपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते, नंतर कोरोनाच्या पार्श्वभूमिवर तिला घरी पाठवण्यात आले. सध्या आईची मानसिक स्थिती योग्य नसल्याने जवळपासच्या कोणत्याही एका रुग्णालयात दाखल करण्यात यावे.' याची दखल घेत सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी वाळवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांना तातडीने संपर्क साधून कार्यवाहीच्या सूचना दिल्या आणि वाळवा तालुका आरोग्य विभागाने डॉ. साकेत पाटील यांच्या प्रयत्नांतून तात्काळ प्रतीक यांच्या आईला इस्लामपूर येथील एका रुग्णालयात उपचार देखील सुरू केले.

हे पण वाचा - ...त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात मुलांना गणवेश मिळणे होईल कठीण 


जिल्हा प्रशासनाकडून सूचना येताच कार्यवाही 
कोणताही गंभीर आजार असणाऱ्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधून रुग्णांची माहिती द्यावी. कुणाचाही गैरसोय होऊ नये यासाठी आमचे प्रशासन प्रयत्नशील आहे."

- शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी वाळवा पंचायत समिती 

हे पण वाचा -  कोण जाणून घेणार यांची व्यथा; विचार करायला लावणारी आहे यांची कथा