भुदरगड : रस्त्यावरील झाडांची बेसुमार कत्तल; प्रशासनाचे दुर्लक्ष | Tree Cutting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tree Cutting

भुदरगड : रस्त्यावरील झाडांची बेसुमार कत्तल; प्रशासनाचे दुर्लक्ष

कोनवडे : टिक्केवाडी (ता. भुदरगड) येथील वेशीपासून ते नाधवडे वेशीपर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची संबंधितांनी अक्षरशः कत्तल (Tree Cutting) केली आहे. सामाजिक वनीकरण मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायतीने निर्माण केलेली वनराई भुईसपाट केल्याने रस्ता व निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर उजाड बनला आहे. शासन प्रतिवर्षी वृक्षारोपन (Plantation) करुन पर्यावरण (Environment) संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी शतकोटी वृक्षलागवडीच्या योजनेतून करोडो रुपये खर्च करुन पर्यावण पुरक कार्यक्रम राबवित आहे.

मात्र टिक्केवाडी येथे झाडे 'लावा, झाडे जगवा' हा उपक्रम 'झाडे लावा, झाडे तोडा' असा उलटा प्रवास होताना दिसत आहे. गेल्या चौदा वर्षापूर्वी येथील ग्रामपंचायतीने टिक्केवाडी ते नाधवडे वेशीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा विविध जातीच्या वृक्षांची लागवड केली होती. तत्कालीन ग्रामसेवक व ग्रा. पं. पदाधिकारी यांनी अक्षरशः बैलगाडीत बँरेल टाकून उन्हाळ्यात या झाडांना पाणी घालून जगवले होते. त्यामुळे या झाडांची चांगली वाढ झाली होती. या झाडांमुळे गावच्या सौदर्यात भर पडल्याने प्रवाशांना निर्गसान्निध्यातून प्रवास करत असल्याचा आनंद मिळत होता. पण या वृक्षांची बेसुमार तोड झाली आहे तर उरली-सुरले वृक्षही सध्या भुईसपाट करण्याचा उद्योग सुरु आहे. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींतून होत आहे.

हेही वाचा: कऱ्हाड : ॲक्सल तुटल्यामुळे उसाने भरलेला ट्रक भरचौकात पलटी

लोकांच्या आडमुठ्या धोरणामुळे निसर्ग धोक्यात आला आहे. टिक्केवाडी गाव हे डोंगर कपारीत वसलेलं गाव असून अनेक निसर्गप्रेमी या गावास भेटी देतात. गावच्या सौंदर्यात भर घालणारी व पर्यावरण रक्षण करणारी झाडे तोडल्याने पर्यावरणप्रेमीं व निसर्गप्रेमींतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

रस्त्याकडेची कोणत्याही पद्धतीची धोकादायक नसलेली झाडे तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. सदर झाडे तोडण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

हेही वाचा: हरिहरेश्‍वर बॅंक घोटाळ्याचा तपास ईडीकडे सोपवा : खातेदार कृती समिती

सदर झाडे परवानगीशिवाय तोडली आहेत. संबंधितांनी याबाबत कार्यालयाशी संपर्क साधलेला नसून सदर झाडे शासनाच्या मालकीची आढळल्यास कायदेशीर कारवाई करणार आहे.

-डी. व्ही. कुंभार, उपअभियंता पं. स. भुदरगड

Web Title: Tree Cutting Bhudargad Kolhapur Government Ignore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kolhapurtree
go to top