रंकाळा काठावरील झाडे वाळली

तातडीने पाणी न दिल्यास मरून जाण्याची शक्यता; मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष
trees the banks of Rankala dried up Green Area Development scheme Phulewadi kolhapur
trees the banks of Rankala dried up Green Area Development scheme Phulewadi kolhapursakal

फुलेवाडी : रंकाळा तलावाच्या काठावर हिरवाईसाठी लावलेली झाडे पाण्याअभावी वाळू लागली आहेत. झाडांच्या उशाला पाणी आहे. परंतु, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झाडांना पाणी मिळत नाही. या झाडांना तातडीने पाणी न दिल्यास ती मरून जाण्याची शक्यता आहे.केंद्र शासनाच्या हरित क्षेत्र विकास योजनेअंतर्गत शहरात सात ठिकाणी हिरवाई बहरण्यासाठी झाडे लावली आहेत.

लोकांना नैसर्गिक गारवा मिळावा, नागरी वस्तीत ऑक्सिजन क्षेत्र वाढावे, यासाठी देशी वृक्षांची लागवड करून जैवविविधता व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ही झाडे लावली आहेत. रंकाळा परिसरात इराणी खणीसमोर, पक्षीनिरीक्षण केंद्र परिसरात व रंकाळा तलावाच्या काठाने शेकडो झाडे लावली आहेत. वड, पिंपळ, बकुळ, कांचन, आवळा, चिंच, कदंब अशा देशी वृक्षांचा समावेश आहे. ३० वर्षांपूर्वी लावलेली ही झाडे मोठी झाली आहेत. या झाडातून पाथ वे तयार केला आहे. सकाळी मॉर्निंग वॉकर्स या पाथ वेमधून चालत असतात. गर्द झाडीच्या जंगलातून चालल्याचा लोकांना आनंद मिळतो. जागेनुसार लोकांना जाण्यासाठी मुरुम व मातीचा रस्ता तयार केला आहे. हजारो झाडांची लागवड केली आहे. परंतु, त्यांना आता पाण्याची आवश्यकता आहे.

दोन-अडीच महिन्यांपासून या झाडांना पाणी दिलेले नाही. झाडे वाळू लागलली आहेत. अनेक झाडांची पाने कोमजली आहेत. या वर्षी नोव्हेंबरअखेर पाऊस झाला.त्यावेळी पाण्याची गरज भासली नाही. परंतु, डिसेंबरपासून या झाडांना पाणी मिळाले नाही. या झाडांना पाणी देण्याची मागणी रंकाळाप्रेमींतून होत आहे.

लाखो रुपये खर्च करून रंकाळ्यावर झाडे लावली आहेत. पाण्याअभावी ही झाडे वाळू लागली आहेत. तातडीने या झाडांना पाणी देण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाने करावी.

- विकास जाधव, रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com