
तुरुकवाडी : तुरुकवाडी फाटा (ता. शाहूवाडी) येथील धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव ट्रक दुकानात शिरल्याने तीनजण जखमी झाले. घटनास्थळावरून व शाहूवाडी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी ८.३० च्या सुमारास देवरुखहून चिरा भरून ट्रक क्रमांक (एमएच ११, एएल २०१४) हा शित्तूर वारुणकडे निघाला होता. तुरुकवाडी घाट उतरत असताना ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला आणि तुरुकवाडी फाटा येथील धोकादायक वळणालगत असणाऱ्या सोने-चांदी व किराणा दुकानात घुसला.