गेल्या काही दिवसांत या परिसरातील कृष्णा व पंचगंगा नदीपात्रात मगरींचा वावर दिसून आलेला आहे. त्यामुळे शेतकरी व स्थानिक रहिवासी सतत भीतीच्या छायेखाली आहेत.
कुरुंदवाड : तेरवाड (ता. शिरोळ) येथे पंचगंगा नदीकाठावर (Panchganga River) तेरवाड बंधाऱ्याजवळ अविनाश बोरगावे यांच्या शेतात तब्बल बारा फूट लांबीची मगर शेतकरी, रेस्क्यू फोर्स आणि वन विभागाच्या (Forest Department) अधिकाऱ्यांनी पकडून करून नैसर्गिक अधिवासात सोडली. दरम्यान, पंचगंगा नदीपात्रालगत ही मगर (Crocodile) सापडल्याने शेतकरी व मासेमारी बांधवांच्यात भीती निर्माण झाली आहे.