
कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सहायक पोलिस निरीक्षकाला तिकीट खपविण्याच्या प्रयत्नात अडवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला होता. यावेळी झालेल्या वादातून सहायक पोलिस निरीक्षक विशाल दशरथ मुळे यांना तिकीट एजंटांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी अटकेतील दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.