गर्भलिंग तपासणी (Fetal Gender Detection) आणि गर्भपात केला जात असल्याच्या संशयावरून कळंबा येथील हॉस्पिटलमध्ये छापा टाकला. त्यावेळी तेथे सोनोग्राफी करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने तेथून पोबारा केला.
कोल्हापूर : ‘‘कळंबा येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये (Shraddha Hospital) सोनोग्राफी मशिन (Sonography Machine) घेऊन आलेल्या श्रेयश हुक्केरीचा शोध अद्याप सुरूच आहे. त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांकडे पोलिसांकडून (Kolhapur Police) चौकशी सुरू झाली आहे. हुक्केरीसह त्याच्याकडील सोनोग्राफी मशीन लवकरच ताब्यात घेतले जाईल,’’ असा विश्वास करवीर पोलिस ठाण्याचे (Karveer Police Station) निरीक्षक किशोर शिंदे यांनी व्यक्त केला.