एकाच महिन्यात दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू

महिनाभरापूर्वी मेटील कुटुंबातील पंडित मेटील यांचा मृत्यू झाला
एकाच महिन्यात दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे 
दुर्दैवी मृत्यू
Updated on

हळदी (कोल्हापूर) : गाडेगोंडवाडी (ता. करवीर) येथे एका महिन्यात दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू झाला. पंडित रामचंद्र मेटील (वय ६३) व निवृत्ती रामचंद्र मेटील (वय ६०) अशी त्यांची नावे आहेत.

गाडेगोंडवाडी गावासह परिसरात गेल्या महिनाभरात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. महिनाभरापूर्वी मेटील कुटुंबातील पंडित मेटील यांचा मृत्यू झाला. त्यानंतर निवृत्ती मेटील यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. पण त्यांची देखील कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. निवृत्ती मेटील यांनी सरपंच पदाच्या काळात गावात आदर्शवत विकासकामे केली. लोकसहभागातून प्राथमिक शाळा विकासाबरोबर सहकाराच्या माध्यमातून सामान्यांना आधार दिला. ते वाशी येथील श्री राम पतसंस्थेत तज्ञ संचालक म्हणून तर श्री राम ज्ञानपीठ संस्थेचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. एकाच घरातील दोन कर्त्या पुरुषांच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

एकाच महिन्यात दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे 
दुर्दैवी मृत्यू
डोंगरावरील विदेशी वनस्पतींच्या लागवडीने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satej Patil on Gokul election politics
Kolhapur Crackdown: Former Corporator Booked After Raid on Video Parlour
Ichalkaranji on Edge After Alleged Abuse Case Involving Minor Girls; Police Tighten Security
Rohini Devaba World Wrestling Championship
Marathi News Esakal
www.esakal.com