esakal | दानोळीत नदी परिसरात दोन गव्यांचे दर्शन

बोलून बातमी शोधा

null
दानोळीत नदी परिसरात दोन गव्यांचे दर्शन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

दानोळी (कोल्हापूर) : दानोळी येथे आज (ता.23) रोजी रात्री साडे नऊ वाजता नदी रस्त्यावर दोन गवे आढळले. दानोळीत पहिल्यांदा गवे आढळल्याने शेतकऱ्यामध्ये घबराट पसरली आहे.

स्वप्निल माणगावे व रोहित पाराज नदीवरील मोटर सुरु करण्यासाठी रात्री साडे नऊ वाजता जात होते. त्यावेळी रस्त्यावर त्यांना दोन जनावर आढळली.

प्रकाश झोत टाकल्यानंतर ते गवे असल्याचे समजले. त्यानंतर गावातील लोकप्रतिधींनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. त्यानंतर सरपंच सुनिता वाळकुंजे व उपसरपंच सुनिल शिंदे यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.

Edited By- Archana Banage