

इचलकरंजी : एका तरुणीला इन्स्टाग्राम अकाउंटवरून फॉलो केल्यावरून कबनूर येथे व्हॅलेंटाईन डेच्या रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी तलवारीने हल्ल्यात एका तरुणाच्या कानाला गंभीर इजा झाली. दुसऱ्या गटातील एका युवकाला डोक्यात फरशी घालून गंभीर मारहाण करण्यात आली. हा प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कबनूर फॅक्टरी रस्त्यावरील एका खाद्यपदार्थ गाड्यासमोर घडला होता.