नगराध्यक्ष-माजी उपसरपंचांच्या पतीची भरबाजारात हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

two people dispures in hatkanangale one peros from mayor in kolhapur
two people dispures in hatkanangale one peros from mayor in kolhapur
Updated on

हातकणंगले (कोल्हापूर) : वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने बाजूला करण्यावरून हातकणंगलेचे नगराध्यक्ष अरुण जानवेकर आणि माजी उपसरपंचांचे पती प्रकाश पाटील-नाधवडेकर यांच्यात भर बाजारात हाणामारी झाली. एकमेकांना अर्वाच्य शिवीगाळ करत प्रकरण मारामारीपर्यंत गेले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्यानंतर तडजोडीनंतर यावर पडदा टाकण्यात आला. दरम्यान, या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी ः सकाळी अकराच्या सुमारास प्रकाश पाटील आपली मोटार घेऊन निघाले होते. नगरपंचायत इमारतीजवळ आले असता दुतर्फा लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत पाटील यांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन आरडाओरडा केला. याचवेळी नगराध्यक्ष जानवेकरही मोटार घेऊन आले. वाहतूक कोंडीमुळे त्यांनाही रस्ता मिळेना. यावेळी पाटील व जानवेकर यांच्यात वाहने बाजूला घेण्यावरुन ‘तू- मी, तू-मी’ सुरू झाले.

पाटील यांनी गाडी बाजूला घेत नाही, अशी भूमिका घेत शिवीगाळ सुरू केली. राग सहन न झाल्याने नगराध्यक्षांनी थेट त्याच्या कानसुलात लगावली. त्यामुळे संतप्त पाटील यांनीही नगराध्यक्षांची कॉलर धरत मारहाण केली. काही जणांनी दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला; मात्र बराच वेळ दोन्ही बाजूंनी शिवीगाळ सुरूच होती. त्यामुळे बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. अखेरीस हे प्रकरण पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यावर पडदा टाकण्यात आला. मात्र या प्रकाराची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

"पाटील यांनी गाडी आडवी लावत प्रशासनासह अनेकांना अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे संयम सुटला आणि त्यांच्या कानसुलात लगावली."

- अरुणकुमार जानवेकर, नगराध्यक्ष, हातकणंगले

"वाहतुकीला अडथळा होत असल्याबद्दल जाब विचारला असता नगराध्यक्षांनी भररस्त्यात मारहाण केली. त्यामुळे मी ही त्यांच्या अंगावर गेलो. मारहाणीचा अधिकार त्यांना कोणी दिला?"

- प्रकाश पाटील-नाधवडेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com