कोल्हापुरातील दोन चिमुरड्यांचा जीव अडकला गळ्यात; डॉक्‍टरांच्या प्रयत्नाने वाचला जीव

two surgery of kids in kolhapur CPR hospital both successful
two surgery of kids in kolhapur CPR hospital both successful
Updated on

कोल्हापूर : धामणवाडी (ता. राधानगरी) येथील ४ वर्षाच्या बालकाने खेळता - खेळता एक रुपयाचे नाणे चुकून गिळले. त्यास उलट्यांचा त्रास सुरू झाला. बालकाची स्थिती बिघडत चालल्याने त्यास सीपीआर रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागात दाखल केलं. डॉक्‍टरांनी तातडीने मुलाला तपासले एक्‍स - रेमध्ये अन्ननलिकेच्या सुरुवातीला एक रुपयाचे नाणे अडकल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने डॉक्‍टरांनी तातडीने हालचाल करत. योग्य शस्त्रक्रिया करत अडकलेले नाणं अन्ननलिकेतून यशस्वीरित्या काढण्यात यश मिळवले.

श्वसन नलिकेत अडकले खोबरे 

कागल येथील २ वर्षाच्या मुलीने नारळाच्या खोबऱ्याचा तुकडा खातांना ठसका लागल्याचे सांगितले, त्याप्रमाणे तो खोबऱ्याचा तुकडा श्वसनमार्गात गेला असल्याची शंका कान, नाक, घसा विभागातील डॉक्‍टरांना आली. एक्‍स रे मध्ये ही शंका खरी ठरली. रुग्णाच्या श्वसनमार्गात खोबरे अडकल्याने श्वास घेण्यास त्रास होऊन रक्तातील ऑक्‍सजनची पातळी खाली जात होती.

सीपीआरच्या डॉक्‍टरांनी पूर्ण भूल देऊन जोखमीची शस्त्रक्रिया करून श्वसननलिकेत उजव्या फुप्फुसामध्ये अडकलेला तुकडा काढला. कान, नाक, घसा विभागाने डॉ. अजित लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वासंती पाटील व डॉ. मिलिंद सामानगडकर यांनी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. तसेच डॉ. उल्हास मिसाळ, भूलशास्त्र विभाग यांच्या पथकाचे सहकार्य लाभले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com