esakal | वस्त्रनगरी इचलकरंजीत रुग्णसंख्या दोन हजार पार ः माजी खासदार, महिला पदाधिकारी बाधीत
sakal

बोलून बातमी शोधा

Two thousand patients in Vastranagari Ichalkaranji: Former MP, women office bearers affected

इचलकरंजी ः गेली दोन दिवस थोडासा दिलासा मिळालेली वस्त्रनगरी आज पून्हा वाढलेल्या कोरोना रुग्ण संख्येमुळे हादरली. आज तब्बल 96 नवे रुग्ण आढळले. शहरातील कोरोना रुग्णसंख्येने आज दोन हजारचा आकडा पार केला. आज दिवसभरात तब्बल 147 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जेष्ठ माजी खासदारांसह पालिकेच्या एक महिला पदाधिकारी पॉझीटीव्ह आल्या आहेत. 

वस्त्रनगरी इचलकरंजीत रुग्णसंख्या दोन हजार पार ः माजी खासदार, महिला पदाधिकारी बाधीत

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी ः गेली दोन दिवस थोडासा दिलासा मिळालेली वस्त्रनगरी आज पून्हा वाढलेल्या कोरोना रुग्ण संख्येमुळे हादरली. आज तब्बल 96 नवे रुग्ण आढळले. शहरातील कोरोना रुग्णसंख्येने आज दोन हजारचा आकडा पार केला. आज दिवसभरात तब्बल 147 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, जेष्ठ माजी खासदारांसह पालिकेच्या एक महिला पदाधिकारी पॉझीटीव्ह आल्या आहेत. 
गेली दोन दिवस 50 पेक्षा कमी रुग्ण आढळले होते. त्यामुळे रुग्णसंख्या कांही अंशी घटल्यांने मोठा दिलासा मिळाला होता. आज पून्हा तब्बल 96 नवे रुग्ण आढळल्यांने वस्त्रनगरी हादरली आहे. शहरातील विविध 60 भागातील हे रुग्ण आहेत. शहरातील रुग्णसंख्या 2046 इतकी झाली. रुग्णसंख्येने आज दोन हजारचा आकडा पार केला. आज शहरातील ज्येष्ठ नेते असलेल्या माजी खासदारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वीच त्यांच्या कुटुंबातील अन्य नातेवाईकांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. या शिवाय पालिकेतील एक महिला पदाधिकारी पॉझीटीव्ह आल्या असून त्यांच्यावर कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
आज वार्ड क्रमांक 20 मधील एक 86 वर्षाची महिला दगावली आहे. तिच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोना संसर्गाने मयत झालेल्यांची संख्या आता 94 वर पोहचली आहे. दिवसभरात 147 रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 944 वर पोहचली आहे. ऍक्‍टीव्ह रुग्णांची संख्या 998 इतकी आहे. आज सर्वाधिक 9 रुग्ण जवाहरनगर परिसरात सापडले. तर प्रत्येकी चार रुग्ण विक्रमनगर आणि रसना कॉर्नर परिसरात आढळून आले आहेत. 
या शिवाय धान्य ओळ, पुजारी मळी, साखरपे हॉस्पीटलजवळ, ऋतुराज कॉलनी यापरिसरात प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले. तर दाते मळा, यशवंत कॉलनी, महासत्ता चौक, वर्धमान चौक, अवधूत आखाडा, सुतार मळा, जवाहरनगर हायस्कूल परिसर, तीन बत्ती चौक, कमला नेहरु सोसायटी, जयकिसान चौक, मुरदंडे मळा, आवाडेनगर, बाळनगर परिसरात प्रत्येकी दोन रुग्ण सापडले. या शिवाय अशोक सायझिंगजवळ, संचार कॉलनी, टिळक रोड, जिव्हाजी बॅंकेजवळ, षटकोन चौक, नारायण पेठ, श्रीहरी टाकीजजवळ, मंगळवार पेठ, स्वामी मळा, किस्मत फणीजवळ, शेळके मळा,वेताळ पेठ, लंगोटे मळा, नारायण मळा, राजराजेश्‍वरीनगर, जाधव मळा, जयभवानी, बडवे हॉस्पीटल नजिक, वीरशैव बॅंकेजवळ, झेंडा चौक आदी परिसरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला. 
---- 
दृष्टीक्षेप 
एकूण रुग्ण - 2046 
ऍक्‍टीव्ह रुग्ण - 998 
कोरोनामुक्त - 944 
एकूण मृत - 94 

- संपादन - यशवंत केसरकर

loading image
go to top