Govind Pansare Murder Case : फाटलेली पाने, बंदुकीची गोळी; पानसरेंच्या हत्येप्रकरणी दोघांनी दिली महत्त्वाची साक्ष

बचाव पक्षाचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी साक्षीदारांची घेतली उलट तपासणी
Comrade Govind Pansare
Comrade Govind Pansareesakal
Summary

जामिनावर सुटलेला संशयित समीर गायकवाड हा न्यायालयात उपस्थित होता.

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खून (Govind Pansare Murder Case) खटल्यात काल (मंगळवार) दोन साक्षीदारांची साक्ष आणि उलट तपासणी झाली. शिवाजी शिंदे (सध्या रा. निपाणी, जि. बेळगाव, मूळ रा. शिवाजी पेठ) आणि सुनील जाधव (रा. मोरेवाडी, ता. करवीर) या दोन साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

त्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांनी त्यांची उलट तपासणीही घेतली. पानसरे यांच्या शरीरातून जी गोळी काढण्यात आली, ती शिवाजी शिंदे यांनी पाहिली होती. त्याबद्दल त्यांची साक्ष झाली.

Comrade Govind Pansare
Loksabha Election News: राष्‍ट्रवादीचा राज्यातला पहिला उमेदवार ठरला! शरद पवार गटाच्या 'या' नेत्यानं केली मोठी घोषणा

समीर गायकवाड याच्या गाडीतील (धर्मरथ) पुस्तके, फाटलेली पाने याबद्दल सुनील जाधव यांची साक्ष झाली. बचाव पक्षाचे वकील समीर पटवर्धन, वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी साक्षीदारांची उलट तपासणी घेतली. सरकारी पक्षाकडून ॲड. निंबाळकर, ॲड. शिवाजी राणे, ॲड. विवेक पाटील यांनी काम पाहिले.

Comrade Govind Pansare
Swapnali Sawant Case : स्वप्नाली सावंत खून प्रकरणाला मोठी कलाटणी; पोलिसांना सापडली मृतदेहाची 8 हाडे, कुजलेलं मांस अन् एक दात

पुढील सुनावणी गुरुवारी (ता. १७) आणि शुक्रवारी (ता. १८) होणार आहे. दरम्यान, येरवडा कारागृह आणि बंगळुरू येथील कारागृहातील संशयित आरोपींनी व्हीसीद्वारे उपस्थिती लावली. जामिनावर सुटलेला संशयित समीर गायकवाड हा न्यायालयात उपस्थित होता.

Comrade Govind Pansare
Prithviraj Chavan : 'मुद्दाम कोणीतरी तेलात काडी टाकतंय, तरुण मुलांची डोकी भडकवणाऱ्या भिडेंनी त्यांचं नाव का बदललं?'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com