Sat, June 3, 2023

रस्त्यात पडलेल्या नारळा वरून मोटारसायकल घसरली; दोन ठार
Published on : 8 May 2022, 11:52 am
कोल्हापूर : रस्त्यात पडलेल्या नारळा वरून मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाले. युवराज पांडुरंग कुंभार (वय ३२ रा. आटोळे ता. शाहूवाडी) आणि ऋतुराज सुनील कुंभार (२७ रा. बोरपाडळे पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत. बजागेवाडी(शाहूवाडी) येथे आज दुपारी ही घटना घडली. हे दोघे एकमेकाचे नातलग आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली.