

Ujlaiwadi Accident
esakal
उजळाईवाडी: आजारी सुनेला भेटून तिची विचारपूस करण्यासाठी पती व नातीसह कागलकडे निघालेल्या गीता वसंत जगताप (वय ३९, रा. सरनोबतवाडी, सहारा कॉलनी) यांची इच्छा अखेर अधुरीच राहिली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडीजवळ दुचाकी मालवाहू ट्रकच्या धडकेत अपघातात त्या जागीच ठार झाल्या. यावेळी पती व नात बचावले. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.