
कोल्हापूर : महाशिवरात्री यात्रेनिमित्त वडणगे (ता. करवीर) येथे विनापरवाना बैलगाडा व घोडागाडा शर्यत घेतल्याप्रकरणी महिला सरपंच, उपसरपंचांसह अठरा सदस्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. गावातील संघर्ष चौक ते निगवे मार्गावर शुक्रवारी (ता. २८) या स्पर्धा झाल्या. शर्यतीदरम्यान एका बैलाचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. करवीर पोलिस अधिक तपास करीत आहेत.