
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये गोड्या पाण्यात मोती पिकविण्याचा प्रयोग अपेक्षेपलीकडे यशस्वी झाला असून, एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यश आले आहे. विद्यापीठात पिकलेला पहिला मोती महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते भेट देण्यात आला.