
Public Benefit Legal Reforms : शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर कोल्हापूरची ओळख देशभर पोहोचली. विद्यापीठाच्या अनुषंगाने जिल्ह्यात अनेक गोष्टी झाल्या. त्याचा लाभ येथील सर्वसामान्य घटकांना मिळाला. त्यानंतर मात्र अशीही कोणतीही मोठी संस्था अथवा शासकीय विभाग येथे झाला नाही. मात्र, आता उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे शहरातील पायाभूत सुविधांचा विकास होईल. उद्योग आणि व्यवसायांना चालना मिळेल. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या दोन्ही शहराच्या विकासामध्ये खंडपीठाची भूमिका महत्त्वाची आहे. त्या दृष्टीने विचार करता कोल्हापूरच्या विकासाची नवी कवाडे या निर्णयामुळे आता खुली झाली आहेत.