esakal | कोल्हापूर : दुकाने बंद बाबतचे दुपारी तीनचे अपडेट

बोलून बातमी शोधा

update of 3 pm closed shop in kolhapur dealers VC at today evening in kolhapur

जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व संघटना दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत म्हणजे उद्या शुक्रवारी दुकाने सुरू करू नयेत, असे आवाहन केले आहे. 

कोल्हापूर : दुकाने बंद बाबतचे दुपारी तीनचे अपडेट
sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व दुकानांचे व्यवहार उद्या शुक्रवार (9) सुरू होणार की नाही याबाबत सध्या प्रशासन, शासन आणि व्यापारी यांच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. आज सकाळी स्थानिक व्यापाऱ्यांशी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यामध्ये जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व संघटना दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत म्हणजे उद्या शुक्रवारी दुकाने सुरू करू नयेत, असे आवाहन केले आहे. 

दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स यांचे पदाधिकारी यांची व्ही. सी. आज गुरुवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. उद्या दुकाने सुरू करायची की नाही याबाबत तेथे निर्णय घेणार आहेत.

हेही वाचा - ब्रेकिंग; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त, जिल्हाधिकारी प्रशासक

विशेष म्हणजे काल मुख्यमंत्र्यांच्या व्हीसीमध्ये sop(स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) तयार करण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र तोच तयार न झाल्याने शासनाकडून ही निर्णय घेण्यास दिरंगाई होण्याची शक्यता असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून 'सकाळ'ला सांगण्यात आले.