मुरगूड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC Result) उत्तीर्ण झालेल्या बिरदेव डोणे यांचे रविवारी सकाळी आठ वाजता येथे आगमन झाले. मुरगूड शिवतीर्थपासून मूळ गावी यमगे (ता. कागल) येथील घरापर्यंत धनगरी ढोल, लेझीम पथक, हलगीचा कडकडाट आणि जेसीबीमधून पुष्पवृष्टी अशा जल्लोषी वातावरणात त्यांची मिरवणूक काढण्यात आली.