Vaibhavwadi Kolhapur Railway : अवघ्या 1 तास 36 मिनिटांत कोल्हापूर ते कोकण! 70 वळणे अन् 11 स्टेशन्स; वैभववाडी रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची अपडेट, नव्याने होणार सर्व्हे

Vaibhavwadi Kolhapur railway project latest news : वैभववाडी-कोल्हापूर प्रस्तावित १०७.६५ किमी रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण होणार असून, या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क वाढून रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या व्यापार, उद्योग आणि पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
Vaibhavwadi Kolhapur Railway

Vaibhavwadi Kolhapur Railway

esakal

Updated on: 

रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासाचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या ‘वैभववाडी -कोल्हापूर’ या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रस्तावित रेल्वेमार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे मध्यरेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी पुण्यातील बैठकीत (Vaibhavwadi Kolhapur railway fresh survey) सांगितले. त्यामुळे अनेक वर्षे फक्त चर्चेत असलेल्या या मार्गाला चालना मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. हा मार्ग अस्तित्वात आला तर त्याचा रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापार, उद्योगासह पर्यटनाला फायदा होईल, असा विश्वास विलास पाटणे यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com