esakal | मोटर सायकल अपघातात उत्तूरचा शाळकरी मुलगा जागीच ठार; दोघे जखमी : Kolhapur
sakal

बोलून बातमी शोधा

वैष्णव  पोटे

मोटर सायकल अपघातात उत्तूरचा शाळकरी मुलगा जागीच ठार; दोघे जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उत्तूर (कोल्हापूर) : चव्हाणवाडी रस्त्यावर मोटर सायकल ओढ्यात कोसळून झालेल्या आपघातात वैष्णव उत्तम पोटे( वय १७) हा शाळकरी मुलगा जागीच ठार झाला. या अपघातात प्रेम दिपक मोरवाडकर ( रा.माद्याळ पैकी हुडा ) व ओकांर संजय उतूरकर हे दोन युवक जखमी झाले. पहाटे ५.१५ वाजता जोमकाई देवीच्या आरतीला जाताना हा अपघात घडला. याबाबत दत्तात्रय मनोहर कापसे यानी पोलीसात वर्दी दिली.

प्रेम व वैष्णव इयता दहावी मध्ये शिकतात. ते दोघे सकाळी खाजगी शिकवणी साठी जाणार होते. तत्पुर्वी जोमकाई मंदीरात पहाटे होणा- या ५.३० च्या आरतीसाठी जाण्याचा निर्णय दोघांनी घेतला. प्रेमच्या मोटरसायकलवर पाठी मागे वैष्णव बसला होता. लक्ष्मी मंदीराच्या पुढे उतारावरून ते जात आसताना प्रेमचा गाडीवरचा ताबा सुटला व पुढे असलेल्या ओढ्यात तो गाडीसह जावून पडला. यावेळी मागे बसलेला वैष्णव उडून बाजूला जावून पडला. त्याच्या बरगडी जवळ जोराचा मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. यावेळी या ठिकाणी ओंकार संजय उतूरकर हा रस्त्याकडेला आपल्या मित्राची वाट पहात उभा होता. प्रेमने त्यालाही ठोकरुन जखमी केले यामध्ये त्याचा हात फॅक्चर झाला व गालाला मोठी जखम झाली.

हेही वाचा: घरगुती गॅस स्फोटात अंगणवाडी सेविका गंभीर जखमी: कबनुरातील घटना

दरम्यान ही घटना वैष्णव राहत असलेल्या हावळ गल्लीत समजली. नागरीकांनी तिघाना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डाॕक्टरनी वैष्णव मयत झालेचे घोषीत केले. ओंकारला गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पोलीसांनी प्रेम याचेवर निष्काळजीपणे भरधाव वेगात गाडी चालवून वैष्णव याचे मृत्यूस कारणीभूत ठरलेबाबत त्याचेवर गुन्हा दाखल केला.

वैष्णव याच्या पश्चात आई ,वडील व भाऊ असा परिवार आहे.या घटनेने गावळ गल्लीसह गावावर शोककळा पसरली.दुपारी उतूर येथे त्याचेवर अंत्यसंस्कार करणेत आले. अधिक तपास सहाय्यक फौजदार बी.एस.कोचरगी करीत आहेत.

loading image
go to top