वाहनांच्या नंबरचीही चोरी; गुन्हा एकाचा, मनस्ताप दुसऱ्याला

शहरात स्क्रॅप झालेल्या एका रिक्षावर खोटा क्रमांक लावून ती रस्त्यावर फिरवली जात होती
वाहनांच्या नंबरचीही चोरी; गुन्हा एकाचा, मनस्ताप दुसऱ्याला

कोल्हापूर : वाहन झाले, पैसे, दागिने, स्पेअर पार्ट झाले, आता नंबरचीही चोरी होऊ लागली आहे. त्यामुळे गुन्हा एकाचा आणि दंडात्मक कारवाईचा मनस्ताप दुसऱ्याला असे घडते. नुकताच असा प्रकार उघडकीस आला आहे. दंडात्मक कारवाईपुरताच हा प्रकार मर्यादित नाही. खोटा नंबर लावलेल्या वाहनाचा गुन्ह्यात वापर झाला तर विनाकरण चांगल्या माणसाला चौकशीचा ससेमिरा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्क्रॅप केलेल्या वाहनांच्या नोंदी व क्रमांकाबाबत अधिक दक्ष राहण्याची गरज बनली आहे.

शहरात स्क्रॅप झालेल्या एका रिक्षावर खोटा क्रमांक लावून ती रस्त्यावर फिरवली जात होती. वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दल संबंधित रिक्षा मालकाला प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) व शहर वाहतूक शाखेने नोटीस पाठवली. त्याबद्दलचा संदेश वाहन मालकाच्या मोबाईलवर आला. रिक्षा रत्नागिरीत असताना तिच्यावर कोल्हापुरात कसा दंड झाला, याबाबतची तक्रार त्यांनी वाहतूक पोलिसांकडे केली. याचा तपास पोलिसांनी सुरू केला. संबंधित रिक्षा शोधून काढली. संबंधित चालक रत्नागिरीतील रिक्षाच्या क्रमांकाचा आधार घेत रिक्षा फिरवत असल्याचे पुढे आले. केवळ चालकाला आलेल्या दंडाबाबतच्या संदेशाची चौकशी केल्यावरून वाहन क्रमांक चोरीचा हा प्रकार उघड झाला.

वाहनांच्या नंबरचीही चोरी; गुन्हा एकाचा, मनस्ताप दुसऱ्याला
गडहिंग्लज-चंदगड हायवेवर झालेल्या अपघातात पोस्टल कर्मचारी ठार

जिल्ह्यातील चोऱ्या, घरफोड्या, वाहन चोऱ्याचे प्रकार आता नवे राहिलेले नाहीत. वाहनाना खोटा क्रमांक लावून गैरप्रकार करण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिसांकडून विनानंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जाते. जिल्ह्याबाहेरून आलेल्या वाहनांची चौकशी केली जाते. यापूर्वी अशा तपासणी चौकशीतून वाहन चोरटे, चेन स्नॅचर पोलिसांच्या हाती लागले आहेत. आता स्क्रॅप वाहनांवरही खोटा नंबर लावून त्याचा गैरवापर केला जाऊ लागला असल्याचा प्रकार पुढे आला. गैरकृत्य करणाऱ्यांनी जो खोटा क्रमांक वाहनासाठी वापरला आहे त्यामुळे वाहन मालकाला मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. कारवाईत त्याला विनाकारण चौकशीला सामोरे जावे लागते आहे. असे प्रकार टाळण्यासाठी आता आरटीओनेही स्क्रॅप वाहनांच्या नोंदी व क्रमांकाबाबत अधिक दक्ष राहण्याची वेळ आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com