
Vijaysinh Mane Land Return : वाठार तर्फे वडगाव गावची साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला भाडेपट्टीवर देण्यात आली. याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला व साखळी उपोषण सुरू केले. यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत संस्थेने गावाची जमीन परत करावी, असा तोडगा काढण्यात आला. त्याला संस्थेचे प्रमुख विजयसिंह माने यांनीही होकार दिला. पुढील दोन दिवसांत दोन्ही बाजूचे अर्ज द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या बैठकीत केली.
या बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने, माजी आमदार राजू आवळे, राजीव आवळे, रविकिरण इंगवले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सुरुवातीला वाठर तर्फे वडगावचे सरपंच सागर कांबळे यांनी या विषयाची पार्श्वभूमी सांगितली.