Vidahsabha Election: राजस्थान निवडणुकीचा प्रचार चक्क कोल्हापुरात, काँग्रेसचे आमदार पोहचले जैन समाजाच्या भेटीला

congress party
congress partyesakal
Published on: 

Vidahsabha Election: राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. यातच सिरोही-शिवगंज विधानसभा मतदारसंघाचे आमदार व कॉंग्रेसचे उमेदवार संयम लोढा यांनी प्रचारासाठी थेट कोल्हापुरात येऊन येथील राजस्थानी समाजाशी संवाद साधला.

congress party
Bjp Vs Congress: नक्षलवाद मोडण्यात केंद्राचे योगदान नाही; काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा दावा!

ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभेची निवडणूक असल्यास येथील स्थानिक उमेदवार मुंबईत स्थायिक झालेल्या मतदारांचे मेळावे घेत असल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. तीच पद्धत राजस्थानमध्ये निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने राबवली आहे. सध्या राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक सुरू झाली आहे. राजस्थानमधून अनेकजण येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. ते आपल्या गावी ये-जा करत असतात. त्याचबरोबर तेथील अनेकजण व्यवसायानिमित्त देशभर फिरत असतात. अशा प्रवास करणाऱ्या राजस्थानी व जैन समाजातील नागरिकांच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त भेटी घेण्यासाठी आमदार लोढा आले.

ते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सल्लागारही आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जैन समाज व राजस्थानी प्रवासी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. तिथून त्यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जैन मंदिरातील दर्शनानंतर गुजरीतील मरुधर भवनात प्रवासी आणि जैन समाजाशी संवाद साधला. निवडणुकीच्या प्रचारासाठी आल्याचे सांगत साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी नगरसेवक ईश्वर परमार, मोहब्बतसिंग देवोल, रमेश पुरोहीत, गुलाबचंद राठोड, नरेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.

congress party
Bjp Vs Congress: भाजप इव्हेंट पार्टी आहे ; काँग्रेस पदाधिकाऱ्याचा आरोप !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com