
कोल्हापूर : दादा गुरवार हाय खोटं बोलत नाही, अठराशे ठरले होते आणि तुम्ही पंधराशे आणि तीनशे दिलाइसा. व्यवहाराच्या आकडेमोडीच्या फेऱ्यात गोंधळलेल्या या भाबड्या मोलकरणीच्या व्हिडिओने आज समाज माध्यमात धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओची लोकप्रियता इतकी वाढली आहे की एका दिवसातच त्याच्यावर मिम्स बनले आहेत. आकडेमोडीच्या या कचाट्यातून वाचण्यासाठी तर अठराशेच्या नोटेचा फोटो बनवून तो व्हायरल करण्यात येत आहे.
मावशी तुम्ही बरोबर आहात, अजिबात माघार घेऊ नका, आम्ही आहोत तुमच्या बरोबर, अशा आशयाच्या कमेंट्स ने हा व्हिडिओ फॉरवर्ड केल्याने इनबॉक्स भरले आहेत.घरकाम करणाऱ्या मोलकरणीच्या कामाचे पैसे देण्यावरून चाललेली आकडेमोडीच्या व्हिडिओमध्ये ती एका तरुणाशी वाद घालत आहे. महिन्याकाठी अठराशे रुपये पगाराचा ठरला. महिन्यानंतर कामाचे पैसे देखील देण्यात आले, मात्र गणितातील आकडेमोड न समजल्यामुळे एक मनोरंजक संवाद यातून निर्माण झाला आहे.
व्हिडिओतील तरुणाने अनेक प्रयत्नांनी तुमचे संपूर्ण पैसे दिले असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आपली फसवणूक होत आहे की काय, या शंकेने या मोलकरणीने व्यवहार पूर्ण झाला नसल्याचा सांगत आपला वाद सुरूच ठेवला. यातील आपला व्यवहार अठराशे रुपयाचा ठरला होता. तुम्ही मात्र मला पंधराशे आणि नंतर तीनशे रुपये दिले. यामुळे अजून पैसे देणे बाकी आहेत, असे म्हणत आणखी पैशांची मागणी करत आहेत. या संपूर्ण संवादातून चांगलेच मोरंजन होत असून इंटरनेटवर सर्वाधिक चालणार हा व्हिडिओ ठरत आहे.
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.