Vidhan Parishad Election : कोल्हापूर जिल्ह्यात 415 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vidhan parishad election

Vidhan Parishad Election : 415 मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द

कोल्हापूर : विधान परिषदेच्या कोल्हापूर मतदार (Vidhan Parishad Election) संघामध्ये 416 पैकी 415 मतदारांची अंतिम यांदी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये नगरपरिषद, नगरपंचायतींचे 338 तर, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे 77 मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य विजय भोजे यांना उच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार नाकारला आहे. मतदान यादी अंतिम झाल्यानंतर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत.

जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींमध्ये सर्वाधिक मतदार करवीर 11 व हातकणंगले 11 तालुक्‍यात आहेत. तर सर्वात कमी गगनबावडा येथे 2 मतदार आहेत. नगरपरिषद व नगरपंचायत मतदारांमध्ये सर्वाधिक 67 मतदार इचलकरंजी तर सर्वात कमी मतदार हातकंणगले19, शिरोळ 19 व पन्हाळा 19 आहेत.

हेही वाचा: जिल्हा बँक निवडणूकीचे पुन्हा बिगुल वाजले ; उच्च न्यायालयाचे आदेश

नगरपरिषद व नगरपंचायत मतदार संख्या :

इचलकरंजी 67 नगरसेवक, कागल 23, आजरा 20, हुपरी 21, जयसिंगपूर 28, चंदगड 20, गडहिंग्लज 22, मुरगूड 20, हातकणंगले 19, वडगाव 20, पन्हाळा 19, मलकापूर 20, शिरोळ 19, जयसिंगपूर 28, कुरूंदवाड 20 असे एकूण 338 मतदार आहेत.

जिल्हा परिषद सदस्य मतदार संख्या :

चंदगड 4, आजरा 3, गडहिंग्लज 5, राधानगरी 5, भुदरगड 4, कागल 5, हातकणंगले 11, करवीर 11, गगनबावडा 2, पन्हाळा 6, शाहुवाडी 4, शिरोळ 5 असे एकूण 65 मतदार आहेत.

पंचायत समिती सभापती मतदार संध्या :

चंदगड, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, कागल, हातकणंगले, करवीर, गगनबावडा, पन्हाळा, शाहुवाडी, शिरोळ प्रत्येकी 1 असे एकूण 12 मतदार आहेत.

loading image
go to top