"मी निवडणुकीत पराभूत जरी झालो तरी मला पद मिळणार होते याची मला खात्री होती. काही सहकाऱ्यांनीच दगाफटका केल्याने वातावरण पूरक असूनही थोडक्यात माझा पराभव झाला."
कोल्हापूर : ‘राहुल गांधी (Rahul Gandhi) थंड हवा खाण्यासाठी महाबळेश्वरला (Mahabaleshwar) आले होते. महाराष्ट्रात केवळ थंड हवेसाठी आलो, अशी टीका होऊ नये म्हणून स्फोटक वक्तव्य करत सरकारवर टीका करून गेले. परभणीमध्ये काय घडले, हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी आवश्यक ते सर्व काही केले आहे,’ अशी टीका विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी केली.