
कोल्हापूर : कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी राज्य सरकारचा कायम विरोध आहे. याबाबतची सरकारची लेखी भूमिका केंद्र सरकारला पाठवली आहे. मात्र, आंध्र आणि तेलंगणा सरकारनेही आलमट्टी धरणाची उंची वाढवू नका, अशी भूमिका घेतली आहे, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे दिली. कालवा समिती बैठकीच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.