पन्हाळा (Panhala) तालुक्यातील आवळी येथे एमआयडीसी करण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू आहेत. तेव्हा आवळी ग्रामस्थांनी २०२४ च्या ग्रामसभेत विरोध दर्शवत आराखड्यातून गाव वागळण्याचा ठराव केला.
पन्हाळा : आवळी (ता. पन्हाळा) येथे होत असलेल्या एमआयडीसीसाठी (Awali MIDC) संपादित होणाऱ्या जमिनींमुळे येथील बहुतांश शेतकरी भूमिहीन होणार असल्याने या एमआयडीसीला येथील ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला. याबाबत ग्रामसभेतील एमआयडीसी आराखड्यातून गाव वगळण्यासाठी केलेल्या ठरावासह जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी पन्हाळा, तहसीलदार, कार्यकारी अधिकारी म. औ. वि. महामंडळ कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाव्दारे एमआयडीसी रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.