esakal | महामंडळाची नवी शक्कल; लालपरी धावणार चालक-वाहकांनी सुचवलेल्या मार्गावर I ST
sakal

बोलून बातमी शोधा

st bus

एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी वारंवार अनेक प्रयत्न महामंडळाकडून केले जात आहेत.

महामंडळाची नवी शक्कल; लालपरी धावणार चालक-वाहकांनी सुचवलेल्या मार्गावर

sakal_logo
By
- राजेश शेळके

रत्नागिरी : गणेशोत्सवापासून एसटीची वाहतूक पूर्वपदावर येत आहे. महामंडळाने एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. कोणत्या मार्गावर अधिक भारमान आहे, कोणत्या मार्गावर कमी, याची माहिती चालक-वाहकांना असते. त्यामुळे यापुढे चालक-वाहकांनी सुचवलेल्या मार्गावर एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आगारामध्ये स्वतंत्र रजिस्टर ठेवले असून त्यामध्ये चालक-वाहकांनी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एसटीचा तोटा भरून काढण्यासाठी वारंवार अनेक प्रयत्न महामंडळाकडून केले जात आहेत. त्यासाठी कोरोना काळात एसटी वाहतूकसेवेत दाखल झाली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र अजूनही ग्रामीण भागामध्ये कोरोनाची भिती कायम असल्याने शासनाच्या सूचनेने एसटी सेवा पूर्ववत केली असली तरी अनेक मार्गावर अपेक्षित भारमान मिळत नाही; मात्र तरी तोटा सहन करून तो मार्ग सुरू ठेवावा लागतो. तोटीतील फेऱ्या न परवडणाऱ्या असल्याने कोणत्या फेऱ्या सुरू ठेवाव्यात आणि कोणत्या बंद याबाबत थेट एसटी चालक-वाहकांनाच आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून धरली शेतीची कास

कोणत्या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद चांगला असतो, कोणत्या मार्गावर कमी प्रवाशी नसतात, कुठल्या वेळेत फेरी सुरू करणे आवश्यक आहे. याची माहिती कर्तव्यावर असलेल्या चालक-वाहकांना असते. चालक-वाहकांनी कोणत्या मार्गावर कोणत्या वेळेत फेऱ्या सुरू ठेवाव्यात यासाठी माहिती देण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी नोंदवही ठेवण्यात आली आहे. प्रत्येक आगारातून रजिस्टरवरील सूचना पाहून संबंधित मार्गावर फेऱ्या सुरू किंवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तोट्यातील अनावश्यक फेऱ्या रद्द करून भारमान अधिक असलेल्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्ग, थांबेही ठरवणार

चालक-वाहकांना प्रवासी प्रतिसाद पाहून फेऱ्या वाढवण्याबाबतच्या सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन थांबे तसेच मार्ग ठरवण्याबाबत त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचे पालन केले जाणार आहे.

हेही वाचा: देवाचं दर्शन घेतले, नंतर स्वतःवर वार करत तरुणाने संपवले जीवन

  • जिल्ह्यात सुरू असलेल्या एकूण बसेस ६०६

  • विभागात सुरू असलेल्या एकूण फेऱ्या ३६००

  • एकूण चालक ९४५

  • एकूण चालक कम वाहक १३६६

  • एकूण वाहक ७६९

  • शालेय फेऱ्या ८०० (लवकरच होणार सुरू)

"चालक, वाहक दैनंदिन बसफेऱ्या घेऊन जात असल्याने कुठल्या मार्गावर, कुठल्या थांब्यावर प्रवाशांचा प्रतिसाद लाभतो, याची माहिती त्यांना अधिक असल्याने बसेस कुठल्या मार्गावर सुरू कराव्यात यासाठी सूचना करण्याचे आवाहन चालक, वाहकांना केले आहे. महामंडळाच्या सूचनेनुसार, प्रत्येक आगाराला व वाहन चालकांना सूचना केली आहे. आगारपातळीवर रजिस्टर उपलब्ध केले असून सूचनांची दखल घेतली जाणार आहे."

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक

हेही वाचा: भाडेकरू ठेवताय... सावधान! नाहक त्रासाला जावे लागेल सामोरे

loading image
go to top