
मराठवाड्यात धुमाकूळ घालणारे ‘भाग्यश्री’चे ढवारा मटण आता कोल्हापुरात येणार आहे.
esakal
HighLight Point :
मराठवाड्यातील प्रसिद्ध ‘भाग्यश्री हॉटेल’ची ११वी शाखा आता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात सुरू होत असून, ११ ऑक्टोबरपासून ती सुरु होणार आहे.
‘ढवारा मटण’ आणि ‘नादखुळा रस्सा’साठी प्रसिद्ध असलेले मालक नागेश मडके आता कोल्हापुरी तिखट चवीच्या रसिकांना आपला खाद्यअनुभव देणार आहेत.
सोशल मीडियावर ‘भाग्यश्री’ आणि मडके यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असून, नेटकरी कोल्हापुरी भाषेत मजेशीर स्वागत करत आहेत — “तांबडा-पांढरा सांभाळा रे!”
Kolhapuri Mutton : मराठवाड्यातील ‘ढवारा मटण’ आणि ‘नादखुळा रस्सा’चा आस्वाद घेणाऱ्यांसाठी ही खुशखबरच आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात आपल्या हटके स्टाईलने, स्वस्त दरात मिळणाऱ्या थाळीने आणि वेळोवेळी बंद राहूनही फेमस झालेल्या भाग्यश्री हॉटेलने आता कोल्हापूरच्या खाद्यविश्वात पाऊल टाकले आहे. ‘भाग्यश्री’चे मालक नागेश मडके यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात या हॉटेलची ११ वी शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, ११ ऑक्टोबरपासून ती कोल्हापूरकरांच्या सेवेत येणार असल्याची माहिती त्यांनी स्वतः इन्स्टाग्रामवरून दिली आहे.