VIDEO - सावधान! रस्त्यावरून फिराल तर ॲम्ब्युलन्स मधून नेणार ?

शहरात पोलिसांची प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे सोशल मीडियावर दिसून येते
VIDEO - सावधान! रस्त्यावरून फिराल तर ॲम्ब्युलन्स मधून नेणार ?

कोल्हापूर : कोल्हापुरात कडक (kolhapur district) लॉकडाऊनमध्ये (lockdown) रस्त्यावरून फिरला तर पीपीई (PPE kit) किट घालून आलेल्या रुग्णवाहिकेतून पोलिस (kolhapur police) घेवून जातात. पोलिसांकडून अशी कारवाई सुरू झाली असल्याचा व्हिडिओ व्हायरल (viral video) झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात पोलिसांची प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहे. प्रत्यक्षात वस्तूस्थिती वेगळीच आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या इमारतीशेजारी माळकर तिकटी (चौक) आहे. शहरातील हा एक मुख्य चौक आहे. तेथे रस्त्यावरून विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून करावाई सुरू आहे. अचानकच पोलिसांसमोर रुग्णवाहिका येते. पीपीई कीट घातलेले तीघे उतरतात. आणि पोलिसांसमोर रस्त्यावर फिरणाऱ्यां दोघांना उचलून रुग्णवाहिकेत घालून घेवून जातात. रस्त्यावरून फिरणाऱ्यांची एकच धांदल उडते. हा व्हिडिओ सध्या कोल्हापुरात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

VIDEO - सावधान! रस्त्यावरून फिराल तर ॲम्ब्युलन्स मधून नेणार ?
'मराठा आरक्षण रद्द होण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार'

माळकर तिकटी असे पोस्ट करून हा व्हिडिओ वेगाने फॉरवर्ड होत आहे. प्रत्यक्षात ही कारवाई कोल्हापूर पोलिसांनी केलेली नाही. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून याला नकार देण्यात आला. याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे अधिक माहिती घेतली असता, ही कारवाई झाल्याचे दाखवणारी डॉक्युमेंट्री एका हॉस्पीटलकडून तयार केली जात आहे. त्याचे हे चित्रीकरण असल्याचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांनी ‘सकाळ' शी बोलताना सांगितले. प्रत्यक्षात अशी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात केली जात नसल्याचेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com